'आता हे थांबवलं पाहिजे'; 'या' एका कारणामुळे अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका करणं केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 03:52 PM2023-05-22T15:52:31+5:302023-05-22T15:58:23+5:30
Alka kubal: अलका कुबल यांनी अनेक सिनेमांमध्ये देवीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिका पडद्यावर गाजल्यादेखील. मात्र, एका घटनेनंतर त्यांनी या भूमिका करण्यास नकार दिला.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). गेल्या कित्येक वर्षांपासून अलका कुबल मराठी सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. विशेष म्हणजे माहेरची साडी या सिनेमातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आदर्श, सोशिक सून अशी त्यांची प्रेक्षकांमध्ये इमेज तयार झाली. इतकंच नाही तर त्यांनी काही धार्मिक सिनेमांमध्येही काम केलं आहे. मात्र, एका गाजलेल्या सिनेमानंतर त्यांनी यापुढे कधीही देवदेवतांच्या भूमिका साकारणार नसल्याचा निश्चय केला. यामागचं कारण, त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं.
अलका कुबल यांनी अनेक सिनेमांमध्ये देवीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिका पडद्यावर गाजल्यादेखील. मात्र, एका घटनेनंतर त्यांनी या भूमिका करण्यास नकार दिला. काळुबाईच्या नावाने चांगभलं या सिनेमामध्ये त्यांनी पहिल्यांदाच देवीची भूमिका साकारली होती. त्यानंतर,काळुबाई पावली नवसाला, माय माऊली मनुबाई, गृहलक्ष्मी अशा कितीतरी सिनेमात त्यांनी देवीची भूमिका वठवली. परंतु, या भूमिका साकारुन लोक त्यांना देवासमान मानू लागले.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने सेटवर खेचले होते अलका कुबल यांचे केस; कारण..
"देवीच्या भूमिका साकारल्यामुळे लोक मला वाटेत कुठेही भेटले तरी नमस्कार करु लागले. इतंकच नाही तर लोकं माझ्या पाया पडू लागले. त्यामुळे यापुढे देवीच्या भूमिका करायच्या नाहीत असं ठरवलं", असं अलका कुबल म्हणाल्या.
'शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती'; अलका कुबल यांचं हिंदी सिनेमांविषयी थेट वक्तव्य
पुढे त्या म्हणतात, "ज्यावेळी वयस्क स्त्रिया माझ्या पाया पडू लागल्या तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की बास्स आता कुठेतरी थांबलं पाहिजे." दरम्यान,माहेरची साडी सुपरहिट ठरल्यानंतर त्यांच्याकडे याच धर्तीच्या अनेक भूमिका आल्या होत्या. मात्र, त्या एकाच पठडीतल्या भूमिका करुन कंटाळल्यामुळे त्यांनी जवळपास ५० भूमिकांना नकार दिला.