Alka Kubal: तब्बल ३० वर्षांनंतर येणार ‘माहेरची साडी’चा सीक्वल? अलका कुबल म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:06 AM2023-03-19T11:06:49+5:302023-03-19T11:08:54+5:30

Alka Kubal, Maherachi Sadi 2 : होय, सुमारे ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी’चा सीक्वल येणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आता यावर खुद्द अलका कुबल यांनी खुलासा केला आहे.

Marathi Actress Alka Kubal Talk on Marathi Film Maherachi Sadi | Alka Kubal: तब्बल ३० वर्षांनंतर येणार ‘माहेरची साडी’चा सीक्वल? अलका कुबल म्हणाल्या...

Alka Kubal: तब्बल ३० वर्षांनंतर येणार ‘माहेरची साडी’चा सीक्वल? अलका कुबल म्हणाल्या...

googlenewsNext

१९९१ साली आलेल्या ‘माहेरची साडी’ (Maherachi Sadi ) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अलका कुबल (Alka Kubal), उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, विक्रम गोखले अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आजही अलका कुबल यांचा हा सिनेमा टीव्हीवर लागला की, रिमोट याच चित्रपटाजवळ येऊन थांबतो. सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया अशी ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटात अलका कुबल यांनी सूनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. महिला वर्गाने हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. हा सिनेमा आठवण्याचं कारण म्हणजे, याच्या सीक्वलची सुरू झालेली चर्चा. 

होय, सुमारे ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी’चा सीक्वल येणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आता यावर खुद्द अलका कुबल यांनी खुलासा केला आहे. नुकतीच झी मराठीच्या अवॉर्ड’ सोहळ्यात अलका कुबल यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना ‘माहेरची साडी २’बद्दल विचारण्यात आलं. ‘माहेरची साडी’च्या सीक्वल मध्ये अलका कुबल सुनेचा छळ करताना दिसणार आहेत, अशी चर्चा आहे, हे खरं आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर,  'मी पण याबद्दल ऐकलं आहे. पण सध्या तरी मला सुद्धा याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाहीये,'असं त्या म्हणाल्या.

‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिग्दर्शक विजय कोंडके यांनी संकेत दिले होतं.  मी चित्रपटाच्या कथेवर काम करत असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची निवड करण्यात येईल. ‘माहेरची साडी २’ काढण्याचा माझा विचार आधीपासूनच होता. माहेरची साडीमध्ये अलका शेवटी मरते असं दाखविण्यात आलं होतं. ती गेल्यानंतर तिने जन्म दिलेल्या मुलाचं आणि तिच्या कुटुंबाचं काय झालं असेल? यावर आधारित चित्रपटाचं कथानक असेल”, असं ते म्हणाले होते.

Web Title: Marathi Actress Alka Kubal Talk on Marathi Film Maherachi Sadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.