बाई गं...चंद्रमुखीतील लावणीची चिमुरडीला पडली भुरळ, अमृता खानविलकरने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:21 PM2022-04-19T18:21:44+5:302022-04-19T18:32:13+5:30
चंद्रमुखी चित्रपटाच्या गाण्यांनी तर चाहते ठार वेडे झाले आहेत. 'बाई गं' ही बैठकीची लावणी आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. सध्या ती खूपच चर्चेत आली आहे. लवकरच ती चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या चंद्राची सर्वत्र बोलबोला पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सध्या सोशल मीडियावर 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'बाई गं..' ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका चिमुकलीचा 'बाई गं..' ही लावणी गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना बाई ग आणि हार्टचे इमोजी असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. सोबतचे या गाण्याची मूळ गायिका आर्या आंबेकर संगीतकार अजय-अतुल, प्रसाद ओक यांनी तिने टॅग केलंय. या चिमुकलीने आपल्या बोबड्या गाण्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 'बाई गं' ही बैठकीची लावणी आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे.
या चित्रपटात अमृता खानविलकर शिवाय आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसा3ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.