'एक्स्प्रेशन्स क्वीन' ! श्रेया घोषालच्या गाण्यावर अमृताची जबरदस्त अदाकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:05 IST2024-04-27T15:04:38+5:302024-04-27T15:05:48+5:30
Amruta khanvilkar: अमृताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'एक्स्प्रेशन्स क्वीन' ! श्रेया घोषालच्या गाण्यावर अमृताची जबरदस्त अदाकारी
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (amruta khanvilkar). उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचं नशीब आजमावलं आहे. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूडसिनेमांमध्येही ती झळकली आहे. अमृता सोशल मीडियावर सुद्धा कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो प्रचंड चर्चेत येत आहे.
'तुम्हाला कोणीही किडनॅप करु शकतं'; अमृताला आला द. आफ्रिकेत भयानक अनुभव
अमृताच्या नृत्यकौशल्य आणि अदाकारीचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे ती कायम आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन डान्स व्हिडीओ शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत.
सोनालीने प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या क्या कहे दिलसे, धडकने पागल...या गाण्यावर सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे.
यावेळी अमृताने दिलेले एक्स्प्रेशन्स नेटकऱ्यांच मन जिंकत आहेत. 'लफ़्ज़ मिल जाये ग़र दिल की ज़ुबान को तो क्या बात हो जाएगी ….,' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.