'ठिपक्यांची रांगोळी'मालिकेतील अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:33 IST2021-12-31T14:22:40+5:302021-12-31T14:33:19+5:30
छोट्या पडद्यावर कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी मालिका 'ठिपक्यांची रांगोळी' (Tipkyanchi Rangoli)अल्पावधीत लोकप्रिय झाली.

'ठिपक्यांची रांगोळी'मालिकेतील अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ
छोट्या पडद्यावर कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी मालिका 'ठिपक्यांची रांगोळी' (Tipkyanchi Rangoli)अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे , अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिकेत मानसी कानिटकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता फडके लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
अमृताने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शुभमंगल सावधान! माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस..असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. अमृतावर तिचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. अमृताने १९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेता सारंग दोशी ह्याच्यासोबत सात फेरे घेतले.मुळची पुण्याच्या असलेल्या अमृताने अनेक नाटकांतून काम केले आहे. यातूनच तिला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. श्री गुरुदेव दत्त, गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत झळकली होती. सध्या ती 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकरते आहे.
अमृता फडके आणि सारंग दोषी हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. या दोघांनी एकाच मालिकेत काम देखील केले होते. दूरदर्शन वाहिनीवरील संघर्ष मिलनाचा या मालिकेत दोघांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. सारंगने छत्रपती संभाजी महाराज या नाटकात सारंग महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय क्राईम स्टॉप सारख्या मालिकेतून तो खाकी वर्दीतल्या डॅशिंग भूमिकेत दिसला.