अश्विनी कासार पडली प्रेमात; शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 06:52 PM2023-05-12T18:52:17+5:302023-05-12T18:53:13+5:30

Ashwini Kasar: अश्विनीच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये.

marathi actress Ashwini Kasar falls in love Shared a special video | अश्विनी कासार पडली प्रेमात; शेअर केला खास व्हिडीओ

अश्विनी कासार पडली प्रेमात; शेअर केला खास व्हिडीओ

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार (ashwini kasar). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अश्विनी आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अश्विनीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जमिनीवर बसली असून ती एका हाताने तिचे केस मोकळे सोडते. सोबतच या व्हिडीओच्या बँकग्राऊंडला राहुल वैद्य याच्या आवाजातील चाँद सी मेहबुबा हे गाणं वाजत आहे. सोबतच तिचे एक्स्प्रेशन्स लक्षवेधी ठरत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओला तिने छान कॅप्शन दिलं आहे. 'Self Love..!' असं कॅप्शन देत ती स्वत:च्याच प्रेमात पडल्याचं तिने सांगितलं आहे.

दरम्यान, अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे. अश्विनीने 'सोयरे सकळ' या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 'एक होती माळीण' या चित्रपटातही ती झळकली होती.
 

Web Title: marathi actress Ashwini Kasar falls in love Shared a special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.