"गेल्या १० वर्षांत...", कान्स फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:08 PM2024-05-30T12:08:15+5:302024-05-30T12:08:45+5:30

कान्स फिल्म फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने खास पोस्ट शेअर केली आहे.

marathi actress bhagyashree mote shared special post for chhaya kadam after winning award in cannes film festival | "गेल्या १० वर्षांत...", कान्स फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट

"गेल्या १० वर्षांत...", कान्स फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट

फिल्मी दुनियेतील महत्त्वाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात चर्चा आहे. यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी हजेरी लावली होती. आईची नथ घालून आणि साडी नेसून छाया कदम रेड कार्पेटवर अवतरल्या. छाया यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'All We Imagine As Light' या सिनेमावर कान्स फेस्टिव्हलमध्ये कौतुकाचा वर्षाव झाला. या भारतीय चित्रपटाला 'कान्स'मध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार मिळाला. 

कान्स फिल्म फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने खास पोस्ट शेअर केली आहे. भाग्यश्रीने छाया कदम यांच्याबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमधून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

"मला माहितीये ही पोस्ट करण्यासाठी थोडा उशीर झालाय. पण, मला पहिलं तुझ्याशी बोलायचं होतं. तुला शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी मी शब्दांची जुळवाजुळव करत होते. गेल्या जवळपास १० वर्षांपेक्षा जास काळापासून मी तुला ओळखते. तुझी मेहनत, तुला आलेली आव्हानं...या सगळ्यातून तू खूप उत्कृष्टरित्या मार्ग काढलास. तुझ्या सिनेमाला 'कान्स'मध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार मिळालेला पाहून मला खूप आनंद झाला.  तू कायमच मला आश्चर्यचकित करत आली आहेस. टीमचं आणि तुझं खूप अभिनंदन. लव्ह यू", असं भाग्यश्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 छाया कदम यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. छाया यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' मध्ये काम केलं. शिवाय आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या 'लापता लेडीज' सिनेमात छाया यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय.

Web Title: marathi actress bhagyashree mote shared special post for chhaya kadam after winning award in cannes film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.