बोल्डनेसनं सर्वांना घायाळ करणारी ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार या सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:25 IST2019-12-24T15:24:55+5:302019-12-24T15:25:26+5:30
बोल्ड फोटोंमुळे ही मराठमोळी अभिनेत्री सोशल मीडियावर असते चर्चेत

बोल्डनेसनं सर्वांना घायाळ करणारी ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार या सिनेमात
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. आता ती एका मराठी चित्रपटात झळकणार आहे, याबद्दल तिनेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितले आहे.
भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. तिने इंस्टाग्रामवर मुहूर्ताच्या क्लॅपसोबत फोटो शेअर करत तिच्या पुढील चित्रपटाचं नाव जीव माझा जाईल असं आहे.
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.
भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.