मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:04 PM2024-11-06T12:04:20+5:302024-11-06T12:05:29+5:30

घटस्फोटाचं कारण सांगताना दीप्ती म्हणाली...

marathi actress Deepti Devi first time talks about her divorce and personal life | मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."

मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."

मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवी (Deepti Devi) सध्या चर्चेत आहे. नुकतीच तिने रेडिओ मुलाखत दिली ज्यामध्ये तिने वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. तसंच दीप्ती खऱ्या आयु्ष्यात नेमकी कशी आहे याचाही उलगडा केला. तिने पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं. दीप्तीचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि लग्नानंतर तीन वर्षांनी तिचा घटस्फोट झाला.

'नाळ', 'बाई गं' या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री दीप्ती देवी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.'रेडिओ सिटी'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी, घटस्फोटाविषयी जास्त बोलले नाही. कारण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. माझं अरेंज मॅरेज झालं होतं आणि मी अजूनही त्यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे त्यांच्याबाबतीत कुणीही बाहेर काहीही चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. जर मी त्यांची सुरक्षा केली नाही तर कोणीच करणार नाही. मी सेलिब्रिटी असल्यामुळे माझ्याकडे खूप पॉवर आहे. माझ्या सांगण्याने बरंच काही होऊ शकेल किंवा एकच बाजू मांडली जाईल. पण कशाला? थोडं प्रोटेक्टिव्ह असणं, थोडं कव्हर करणं मला आवडतं. मला माझा संसार वाचवायचा होता पण ते होऊ शकलं नाही."

घटस्फोटाचं कारण सांगताना दीप्ती म्हणाली, "कदाचित एकमेकांना समजून घेण्यासाठी आम्ही पुरेसा वेळच दिला नाही. गोष्टी स्वीकारल्या नाहीत. जसं मी खूप लहानपणापासून काम करत आहे. मला खूप लोकांसोबत राहण्याची सवय होती. सतत काम करत होते. ते माझं पॅशन आहे. मी कुठून आले हे त्या कुटुंबाला समजणं, तसंच मी सेलिब्रिटी म्हणून वेगळी आहे आणि एक मुलगी म्हणून वेगळी आहे पण हे जर मिक्स केलं तर त्याला सामोरं जाणं या कारणांमुळे कदाचित नातं टिकलं नाही. आम्ही पावणे तीन वर्षी सोबत होतो. कोणीच घटस्फोट घेण्याचा विचार करत नाही पण जेवढा तुमच्याकडे इलाजच नसेल तेव्हा तुम्ही काय कराल?"

वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यात सुरु होता डाऊनफॉल

दीप्ती म्हणाली, "घरच्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही दोघं बसून बोला. त्यांनी कधीच फक्त माझी किंवा फक्त त्याची बाजू घेतली नाही. कारण प्रत्येक पालकाला आपलं मूल आनंदी असणं हेच हवं असतं. तेव्हा माझं करिअर नीट सुरु नव्हतं. दीप्तीचं लग्न झालंय तर तिला आता कामाची गरज नाही, नंतर दीप्तीची डिव्होर्स केस सुरु आहे आता ती पूर्ण वेळ देऊ शकत नाही अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यामुळे वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्हीकडून डाऊनफॉल सुरु होतं."

पुन्हा कधी रिलेशनशिपचा विचार केला का? यावर ती म्हणाली, "मी खूप थकले होते. माझ्या मनात कोणासाठी घर व्हायला खूप वेळ लागतो. तसंच त्या माणसाला मनातून काढण्यासाठीही मला खूप वेळ लागतो. मग असं वाटतं की मी एकटीच खूश  आहे. पुन्हा दुसऱ्यांना दुखवायचं नाहीए आणि स्वत:लाही दुखवायचं नाहीए. 

Web Title: marathi actress Deepti Devi first time talks about her divorce and personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.