बाथटबमध्ये बसून वहिनीसाहेबांचं हटके व्हिडीओ शूट; पाहा धनश्रीचा स्वॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 11:42 AM2021-09-09T11:42:22+5:302021-09-09T11:44:01+5:30
Dhanashri Kadgaonkar : सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी धनश्री कायमच इन्स्टाग्रामवर रिल्स करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. मालिकेत नंदिता गायकवाड ही भूमिका साकारलेली धनश्री आज सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. अलिकडेच धनश्रीने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला असून ती तिचा जास्तीत जास्त वेळ आपल्या बाळासोबत घालवत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या धनश्रीने तिच्या प्रेग्नंसी काळापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे धनश्री कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मात्र, यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. धनश्रीने सध्या बाथटबमध्ये बसून एक हटके व्हिडीओ शूट केला आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी धनश्री कायमच इन्स्टाग्रामवर रिल्स करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. धनश्रीने बाथरुममधील एक हटके व्हिडीओ शूट केला आहे.
धनश्रीने 'कव्हर मी इन सनशाइन' या गाण्यावर हा व्हिडीओ तयार केला असून त्यात ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. विशेष म्हणजे धनश्रीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अन्वीच्या व्हिडीओवर भारतीय जवानांची कमेंट; अंशुमनच्या डोळ्यात तरळलं पाणी
दरम्यान, जानेवारी महिन्यात धनश्रीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. तसंच ‘New life…New chapter’ असं कॅप्शन देत तिने ही गूडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. धनश्री अनेकदा तिच्या बाळासोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. इतकंच नाही तर ती लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संवाद साधत असते. अलिकडेच डिलिव्हरीनंतर वाढलेल्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना तिने चांगलेच खडे बोल सुनावले होते.