स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मराठी अभिनेत्रीने अक्कलकोट गाठलं, चरणांवर झाली नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:08 IST2025-02-04T11:08:15+5:302025-02-04T11:08:32+5:30
गौरी नलावडेदेखील स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करते. नुकतंच गौरीने अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मराठी अभिनेत्रीने अक्कलकोट गाठलं, चरणांवर झाली नतमस्तक
मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकार हे श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. केदार शिंदे, सुकन्या मोने, अभिज्ञा भावे, अमृता खानविलकर हे कलाकार स्वामी समर्थांचे भक्त आहेत. गौरी नलावडेदेखील स्वामी समर्थांची मनोभावे पूजा करते. नुकतंच गौरीने अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.
गौरी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेली होती. दर्शननानंतर तिने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. गुलाबी रंगाचा ड्रेस घालून पारंपरिक पेहरावात गौरी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाली. "खूप सुंदर दर्शन झालं", असं म्हणत गौरीने व्हिडिओ शेअर केला आहे. त्याबरोबरच तिने मंदिरातील व्हिडिओही शेअर केला आहे. परवानगी घेऊनच दर्शनाचा व्हिडिओ काढल्याचं तिने म्हटलं आहे.
स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. गौरीचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. गौरी करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.