गिरिजा ओकचा 'ठकीशी संवाद'; नव्या नाटकाची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:45 IST2024-03-27T17:44:35+5:302024-03-27T17:45:22+5:30
Girija oak: गिरीजाची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकाचा शुभारंभ येत्या १० मे पासून होणार आहे.

गिरिजा ओकचा 'ठकीशी संवाद'; नव्या नाटकाची केली घोषणा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक (girija oak). आजवरच्या कारकिर्दीत गिरीजाने विविध माध्यमांमध्ये काम करुन तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. केवळ मराठी पुरतंच मर्यादित न राहता तिने तिच्या अभिनयाचं नाणं बॉलिवूडमध्येही खणखणीतपणे वाजवलं आहे. विशेष म्हणजे मालिका, सिनेमा, वेबसीरिज केल्यानंतर गिरीजाने पुन्हा एकदा तिचा मोर्चा रंगभूमीकडे वळवला आहे.
जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधत गिरीजाने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद असं तिच्या नाटकाचं नाव असून ती या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या नाटकात तिच्यासोबत अभिनेता सुव्रत जोशी झळकणार आहे.
येत्या १० मे पासून या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग होणार आहे. सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित "ठकीशी संवाद" नक्की काय असणार ने बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. दरम्यान, गिरीजाने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘जवान’ चित्रपटांमध्ये गिरीजाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.