Video: हेमांगी कवीचा नो मेकअप लूक व्हायरल; अभिनेत्रीच्या रिअल ब्युटीची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 18:01 IST2022-05-26T18:01:16+5:302022-05-26T18:01:44+5:30
Hemangi kavi: अभिनेत्री म्हटलं की, अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्या मेकअप, हेअरस्टाइलसाठी लाखो रुपये खर्च करतात. परंतु, हेमांगीने तिचा नो मेकअप लूक शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.

Video: हेमांगी कवीचा नो मेकअप लूक व्हायरल; अभिनेत्रीच्या रिअल ब्युटीची होतीये चर्चा
मराठी कलाविश्वात फार मोजक्या अशा अभिनेत्री आहेत ज्या समाजातील घटनांवर स्पष्टपणे त्यांचं मत मांडत असतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). समाजात कोणतीही घटना घडली की त्यावर हेमांगी उघडपणे व्यक्त होत असते. यावेळी ती मांडत असलेल्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा तिला ट्रोलही व्हावं लागतं. परंतु, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत ती तिचं मत मांडते. यामध्येच समाजिक मुद्द्यावर व्यक्त होणारी हेमांगी कधी कधी तिच्या पर्सनल लाइफविषयीचे अपडेट्सही नेटकऱ्यांना देते. यावेळी तिने तिचा नो मेकअप लूक शेअर केला आहे.
अभिनेत्री म्हटलं की, अनेकदा त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात त्या मेकअप, हेअरस्टाइलसाठी लाखो रुपये खर्च करतात. परंतु, हेमांगीने तिचा नो मेकअप लूक शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे ती विनामेकअपही छान दिसते असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
"तू ना सही, तेरी यादें सही मैं हूँ वही और तू भी.... वही", असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हेमांगी निवांतपणे चहा घेत असून घरातील साध्या कपड्यांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, तिचा हा लूक नेटकऱ्यांना आवडला असून काही मुलींनी तिच्याकडे स्किनकेअर रुटीन टीप्सही मागितल्या आहेत.