Hemangi Kavi : बाहेरच्या देशांत फोटो जास्त क्लिअर आणि..., हेमांगी कवीने शेअर केली पोस्ट, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 10:51 AM2022-08-22T10:51:48+5:302022-08-22T11:02:04+5:30

Hemangi Kavi : होय, हेमांगीने ही पोस्ट शेअर केली आणि बहुतेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

marathi actress Hemangi Kavi post about camera clarity in other country | Hemangi Kavi : बाहेरच्या देशांत फोटो जास्त क्लिअर आणि..., हेमांगी कवीने शेअर केली पोस्ट, झाली ट्रोल

Hemangi Kavi : बाहेरच्या देशांत फोटो जास्त क्लिअर आणि..., हेमांगी कवीने शेअर केली पोस्ट, झाली ट्रोल

googlenewsNext

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) ही सतत या ना त्या कारणानं चर्चेत असते. परखड मत मांडणारी, मनात येईल ते बोलणारी अशी तिची ओळख आहे. यामुळे अनेकदा हेमांगी कवी सोशल मीडियावर ट्रोलही होते. पण म्हणून आपली मतं मांडणं तिने सोडलेलं नाही. सध्या तिची एक पोस्ट चर्चेत आहे. होय, हेमांगीने ही पोस्ट शेअर केली आणि बहुतेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. बाई, तू बाहेरच्याच देशात जाऊन राहा, तुलाही बायकॉट मोहिमेचा भाग व्हायचंय का? अशा शब्दांत काही लोकांनी तिला सुनावलं. आता हेमांगीने अशी काय पोस्ट केली, हे वाचायची उत्सुकता असेलच.

तर  काही दिवसांपूर्वी हेमांगी कवी न्यूयॉर्कला फिरण्यासाठी गेली होती. या ट्रीपचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर  केले होते. याच पार्श्वभूमीवर तिने भारतात काढलेले फोटो आणि परदेशात काढलेले फोटो याबद्दलचं स्वत:च एक निरीक्षण नोंदवलं.

हेमांगीची पोस्ट
बाहेरच्या देशांमध्ये काढलेले photos जास्त clear and clean येतात. आपल्या आणि आपल्या mobile camera मध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? त.टी : सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याच दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे..., अशी पोस्ट हेमांगीने शेअर केली.

झाली ट्रोल
हेमांगीने आपल्या देशाची अन्य देशाशी केलेली तुलना काहींना आवडली नाही. मग काय अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. अर्थात काहींनी तिचं समर्थनही केलं. ‘अ‍ॅपलमधून काढशील तर आपल्याकडेही छान येतात. सगळ्यात महत्त्वाचं कॅमेरा क्वालिटी मॅटर करते. अजून महत्त्वाचं तू जर बाहेर म्हणजे घराबाहेर फोटो काढत असशील स्वच्छ प्रकाशात तर कधीपण छान येतात फोटोज. हे माझं वैयक्तिक मत. तुझं वैयक्तिक मत तुझं आहे. माझं ते माझं आहे. माझं ते माझं आणि माझं तेही तुझं असं माझं म्हणणं अजिबात नाहीये,’अशी कमेंट एका युजरने केली.

तुला पण बॅन मोहिमेचा भाग व्हायचे आहे का? असं एका युजरने लिहिलं. तुझ्या फोटोत नाही तर तू वापरलेल्या शब्दांमुळे तुझ्या पोस्टमध्ये प्रदूषण वाढलेय. काळजी घे बाई, अशी कमेंट एका युजरने केली. म्हणजे प्रदूषण फक्त भारतातच आहे का... अमेरिका आणि अन्य कुठल्याच देशात नाही? असा सवाल एका युजरने तिला केला.

Web Title: marathi actress Hemangi Kavi post about camera clarity in other country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.