एक घोडा घ्या आणि घरी लिंबूचं झाड लावा...; हेमांगी कवीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:57 PM2022-04-12T12:57:44+5:302022-04-12T12:58:32+5:30

Hemangi Kavi : होय, पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर हेमांगीने एका ओळीची पोस्ट केलीये. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील एक ना अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहे.

marathi actress hemangi kavi post on petrol hike | एक घोडा घ्या आणि घरी लिंबूचं झाड लावा...; हेमांगी कवीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

एक घोडा घ्या आणि घरी लिंबूचं झाड लावा...; हेमांगी कवीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

googlenewsNext

बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागणं यामुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi-Dhumal) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलही होते. पण या ट्रोलिंगला न घाबरता हेमांगी बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सध्या तिची एक खास पोस्ट चर्चेत आहे.
होय, पेट्रोल दरवाढीच्या मुद्यावर हेमांगीने एका ओळीची पोस्ट केलीये. पण ही पोस्ट इतकी भारी आहे की, सोशल मीडियावर ती तुफान व्हायरल होतेय. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील एक ना अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहे.

‘ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे,’ अशा आशयाची पोस्ट हेमांगीने फेसबुकवर शेअर केली आहे. सोबत कसंजगायचं, कसंचालायचं, कुणीसांगेलकामला, असे हॅशटॅगही पोस्ट केले आहेत.  
 हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अक्षरश: कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘खूप उशिरा पोहोचला पेट्रोलचा चटका’, अशी कमेंट एकाने केली आहे. ‘मॅम आता तुमची ती घरातली सायकल बाहेर काढा,’ असा सल्ला एका चाहत्याने यावर तिला दिला आहे.

‘एक घोडा घ्या आणि घरी लिंबूचं एक झाड लावा. मग काहीही फिरवायची गरज लागणार नाही,’ अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. लिंबू तरी कुठे स्वस्त आहे. दोन्ही पण महाग. काय वेळ साधली हेमांगीजी, अशी कमेंट अन्य एकाने केली आहे.
‘तुम्ही विम वापरा. त्यात हजारो लिंबाची शक्ती असते आणि पेट्रोलचं म्हणाल तर सगळं मीच सांगायचं का?,’ अशी भन्नाट प्रतिक्रिया अन्य एकाने दिली आहे.

Web Title: marathi actress hemangi kavi post on petrol hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.