गरज आहे का? बोल्ड सीनवर हृता दुर्गुळेने स्पष्ट केलं मत, म्हणाली, "लोक काय म्हणतील..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:36 PM2024-03-03T12:36:55+5:302024-03-03T12:37:14+5:30
हृताचा 'कन्नी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे.
सिनेमा म्हणलं की अनेकदा कलाकारांना बोल्ड सीन्सही द्यावे लागतात. अर्थात ज्याची तयारी असते तोच कलाकार असे सीन्स देतो. हिंदी सिनेसृष्टीत तर अगदी हमखास असे सीन्स दिले जातात. या बोल्ड दृश्यांची चर्चाही होते. मात्र जेव्हा मराठीत कोणी इंटिमेट किंवा किसींग सीन्स देतो तेव्हा लोक वेगळ्या नजरेने बघतात. ट्रोलर्स संस्कृतीवरुन कलाकारांना ट्रोल करतात. याबाबत अभिनेत्री हृता दुर्गुळेला (Hruta Durgule) नेमकं काय वाटतं हे तिने सांगितलं आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे अगदी साधी, गोड अभिनेत्री म्हणून सर्वांच्या मनात आहे. फुलपाखरु, मन उडू उडू झालं या मालिकांमधून तिने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. आता तिचा 'कन्नी' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी सिनेमांमध्ये बोल्ड दृश्य साकारायची असल्यास त्यावर हृताचं काय म्हणणं आहे असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "मी लोकांचा विचार करुन कधीच निर्णय घेतला नाही. म्हणजे मला तशी गरजच वाटली नाही. सर्किटमध्येच फक्त मी आणि वैभव आहोत जे एक प्रोजेक्ट आऊट झालंय बाकी दोन यायचे आहेत. पण मी लोकांचा कधीच विचार केला नाही. पण जेव्हा असं काही असेल तेव्हा मी विचारते की 'हे गरजेचं आहे का? गरज आहे का? हे गाळलं तर चालेल का? हे मी स्पष्ट विचारते. पण गरज असेल तर मी लोकांचा विचार करत नाही."
'कन्नी' हा सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत.