"मराठी असाल किंवा अमराठी असाल तरीही...", क्रांती रेडकरने विकी कौशलचा 'छावा' पाहून सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:38 IST2025-02-17T13:35:27+5:302025-02-17T13:38:50+5:30

"खूप वेगळा अनुभव...", क्रांती रेडकरने पाहिला विकी कौशलचा 'छावा' सिनेमा, भावना व्यक्त करत म्हणाली...​​​​​​​

marathi actress kranti redkar reaction after watching chhaava movie praised vicky kaushal and laxman utekar shared video | "मराठी असाल किंवा अमराठी असाल तरीही...", क्रांती रेडकरने विकी कौशलचा 'छावा' पाहून सांगितला अनुभव

"मराठी असाल किंवा अमराठी असाल तरीही...", क्रांती रेडकरने विकी कौशलचा 'छावा' पाहून सांगितला अनुभव

Kranti Redkar On Chhaava Movie:विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर छावा सिनेमाची सध्या बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळतो आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. 'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शूर पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना कलाकारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, 'छावा' या ऐतिहासिक सिनेमाबद्दल अभिनेत्री क्रांती रेडकरने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत विकी कौशल आणि छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती रेडकर म्हणाली,"नमस्कार, मी क्रांती रेडकर वानखेडे. माझे डोळे आताही सुजलेले दिसतायत कारण काल मी 'छावा' हा चित्रपट बघून आले. हा चित्रपट खूपच इतका हेवी आहे की हे प्रोसेस करण्यासाठी आणि तुम्हाला माणूस म्हणून एक जाणीव करुन देण्यासाठी की तुम्ही या समाजात कुठे उभे राहताय़ माझी अशी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल तरी हा सिनेमा तुम्ही कृपया थिएटरमध्ये जाऊन बघा. हा एक खूप वेगळा अनुभव आहे."

पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "मला असं वाटतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलजींनी जे काही काम केलं आहे. ते इतकं स्तुत्य आहे, इतकं सुंदर आहे की म्हणजे ते महाराज होते, ते राजे होतेच असं वाटंत. शिवाय ते बघताना अंगावर शहारा येतो. त्यांची प्रत्येक मुव्हमेंट, नजर तसेच त्यांची बॉडीलॅंग्वेज त्यांचा लूक आणि ज्या पद्धतीने त्यांनी डब केला आहे. तो एक प्रत्येक नटासाठी मास्टर क्लास आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदाना किंवा बाकीचे कलाकार म्हणजे आशुतोश राणाजी आहेत. बाकीचे आपले सगळे मराठी कलाकार यांनी विकी कौशलला जी साथ सिनेमात दिली आहे. त्याचबरोबर सिनेमॅटोग्रॅफी आणि मेकअप डिपार्टमेंटला तर साष्टांग दंडवत आहे."

लक्ष्मण उतेकर यांचं केलं कौतुक

"लक्ष्मणजी उतेकर तुमचं विशेष कौतुक कारण तुम्ही या धाडसी विषयाला हात घातलात. शिवाय अप्रतिम पद्धतीने सादरीकरण झालं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की फॅक्ट सांगताना कुठेतरी आपण त्यातला भाव मिस करु शकतो ही भीती असते. पण, तुम्ही एका क्षणाला सुद्धा प्रेक्षकांना तो भाव मिस करु दिला नाही. चित्रपटात एका आई आणि मुलामधील नातं असूदे किंवा नवरा बायकोमधील नात असूदे तसेच दोन मित्रांमधील नातं असूदे त्या प्रत्येक भावना तुम्ही जपल्या. या सिनेमातील शेवटची २५ मिनिटं आहेत ती तुम्हाला हे जाणून देतात, की तुम्ही माणूस म्हणून काय करताय. म्हणजे चालताना जरी आपल्याला कोणाचा धक्का लागला तरी चिडणारे आपण किंवा बॉस मला असं बोलला म्हणून चिडणारे. पण महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलं, ज्या पद्धतीच्या यातना भोगल्या. त्या पंचवीस मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलेल. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा."

Web Title: marathi actress kranti redkar reaction after watching chhaava movie praised vicky kaushal and laxman utekar shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.