Manava Naik : “थांब तुला दाखवतोच... त्याने मला धमकावलं...”, अभिनेत्री मनवा नाईकसोबत घडला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 10:15 AM2022-10-16T10:15:35+5:302022-10-16T10:16:40+5:30

Manava Naik : मनवा नाईकसोबत अलीकडे उबरमध्ये एक धक्कादायक प्रसंग घडला. मनवाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, याबाबत खुलासा केला आहे....

marathi actress manava naik share shocking incident in uber car | Manava Naik : “थांब तुला दाखवतोच... त्याने मला धमकावलं...”, अभिनेत्री मनवा नाईकसोबत घडला धक्कादायक प्रसंग

Manava Naik : “थांब तुला दाखवतोच... त्याने मला धमकावलं...”, अभिनेत्री मनवा नाईकसोबत घडला धक्कादायक प्रसंग

googlenewsNext

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून मनवा नाईक (Manava Naik ) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. ‘ब्युटी विद बे्रन’ अशी ओळख असलेल्या याच मनवा नाईकसोबत अलीकडे एक धक्कादायक प्रसंग घडला. मनवाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, याबाबत खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे.
 
मनवाची पोस्ट

हा प्रसंग शेअर करायलाच हवा. मी रात्री 8.15 च्या सुमारास उबर बुक केली. मी वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचल्यावर तो उबर चालक  फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नकोस, असं सांगितलं. पण याऊपरही त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असं करु नकोस, असं पुन्हा बजावलं. पण त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं.  पुढे गेल्यावर ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवलं. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असं मी पोलिसांना सांगितलं. पण त्या उबर चालकाला राग अनावर झाला होता.   तू 500 रुपये भरणार आहेस का? असं त्याने मला संतापून विचारलं.   तू फोनवर बोलत होतास..., असं मी त्याला म्हणाले. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि  मला धमकावणं सुरू केलं. थांब तुला दाखवतोच, अशा शब्दांत त्याने मला धमकावलं.  मी त्याला गाडी पोलीस स्टेशनला घे, असं सांगितलं. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गडद अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.  मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्ये, असं त्याला ओरडून सांगितलं. संपूर्ण प्रवासात त्याने माझ्याशी वाद घातला. गाडी भरधाव वेगाने चालवत असतानाव वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. काय करणार? थांब दाखवतोच आता, अशी धमकी त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाºयासोबत फोनवर बोलत असतानाही तो भरधाव  गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती.   मी त्याला गाडी थांबव, असं सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही. त्याने कोणाला तरी फोन केला. ते पाहून मी जोरजोरात ओरडू लागले. दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढलं. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे मी घाबरले आहे, असं मनवाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मनवाने फक्त लढ म्हण, दम असेल तर, नो एन्ट्री पुढे धोका आहे, पोरबाजार, ढिनच्यॅक एंटरप्राइज, स्पेशल डिश, शासन, पिंडदान, जाऊ द्या ना बाळासाहेब या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘जोधा अकबर’ या सिनेमातही ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. 

Web Title: marathi actress manava naik share shocking incident in uber car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.