मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:23 AM2023-06-12T09:23:53+5:302023-06-12T10:24:28+5:30

निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल.

marathi actress meera joshi car accident shared post for her beloved four wheeler | मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..'

मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..'

googlenewsNext

महामार्गांवर अपघात होण्याचं सत्र सुरुच आहे. मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे. तिची कार मारुती सुझुकी दुभाजकावर धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातात तिच्या कारचा चक्काचूर झाला असून अभिनेत्री मात्र सुखरुप आहे. गाडीचं मोठं नुकसान झाल्याने तिने स्वत: सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल. अभिनेत्रीने स्वत: अपघाताची माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने अपघातानंतर कारची झालेली अवस्था दाखवली आहे. यात ती म्हणते, 'प्रिय सखी, किती आणि कुठे कुठे भटकलो ना आपण दोघी. रात्र, दिवस, ऊन, वारा पाऊस, चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. आज इतका भयंकर अपघात होऊनही तू स्वत:ला संपवणं पत्करलंस. आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजारांचा आपला प्रवास संपला. गमवलं ना मी तुला.' 

मीराची ही पोस्ट पाहून सर्वांनी चिंता व्यक्त केली आहे. मीरा सुखरुप आहे हे तिच्या पोस्टमधून स्पष्ट होतंय मात्र तिच्या गाडीला तिने गमावलं आहे याचं दु:ख आहे. 'काळजी घे','गाडी काळजीपूर्वक चालवा' अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओवर आल्या आहेत.

मीरा जोशी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच ती दुबईला जाऊन आली. तेथील फोटो, व्हिडिओ तिने शेअर केले. तसंच ती उत्तम डान्सर आहे. मीराने 'अग्ग बाई अरेच्चा २'मध्ये काम केले आहे.

Read in English

Web Title: marathi actress meera joshi car accident shared post for her beloved four wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.