माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको! मराठी अभिनेत्रीने सांगितली तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:45 PM2020-06-18T17:45:33+5:302020-06-18T17:56:17+5:30

 तिची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होतेय. अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये बेतलेल्या प्रसंगांना, संघर्षाला तिने वाचा फोडली आहे. 

marathi actress megha ghadge facebook post viral | माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको! मराठी अभिनेत्रीने सांगितली तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी

माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको! मराठी अभिनेत्रीने सांगितली तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी

googlenewsNext
ठळक मुद्दे पछाडलेला, पोपट, माहेरची माया, चल धर पकड यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर अनेक बॉलिवूड, टीव्ही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत. मनातील भावना बोलून दाखवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. आता मराठमोळी अभिनेत्री मेघा घाडगे हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
अभिनेत्री व उत्तम लावणी नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जाणा-या मेघाने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होतेय. अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये बेतलेल्या प्रसंगांना, संघर्षाला तिने वाचा फोडली आहे. पछाडलेला, पोपट, माहेरची माया, चल धर पकड यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. तसेच एकापेक्षा एक अप्सरा आली या झी मराठीवरील प्रसिद्ध डान्स रिअ‍ॅलिटी शोमधील तिच्या डान्सची चांगलीच चर्चा झाली होती.

ती लिहिते,
माणूस म्हणून जन्माला घाल पण कलाकार म्हणून नको..???? अस म्हणायची वेळ आली होती माझ्यावर अनेकदा. नावारुपाला असताना इतक्या लोकांनी नावाची बदनामी केली होती, मारायची धमकी दिली, ‘बालगंधर्व समोर(पुणे) तुला नागड करून मारू..’ किती जणांन सोबत संबंध जोडले ज्यांना मी ओळखतही नव्हते . वडील गेले राहण्याचा धड ठिकाणा नव्हता. भावंड शिकताहेत. वाईट मार्गाला कोणी जाणार तर नाही ना ..? अशा अनेक गोष्टी ईतक्या पटापट .. होत गेल्या कित्येक डिप्रेशन मधून गेले, पुन्हा सावरले . एकदा तर मनस्तापातुन झोपेच्या गोळ्याही घेतल्या.
यातून मला बाहेर काढल आधार दिला तो माझ्या आईने , वडिलांच्या संस्काराने आणि माझ्या भावंडांने .. खरच जगातील अंतीम सत्य ‘कुटुंब’ ?
खर सांगु का अशा परिस्थितीत आपण काय करतोय हे स्वत:लाच कळत नसत . लोक वेडे म्हणतात, सायको म्हणतात..
पण ज्या व्यक्तीमुळे एखाद माणुस स्वत:ला संपवायला निघालाय त्यालाच लोक आधार देतात आणि पुढाकार देतात हेही तितकंच सत्य आहे  आणि त्यात तो पुरूष असेल तर अगदीच सोप्प.
एकदा तर एका महा...पुरूषाने माझे फोटो माझ्या पेक्षा लहान असलेल्या एका xyz मित्रा सोबतचे फोटो सर्व नृत्य दिग्दर्शकांना पोस्ट केले. का केले ? कशासाठी ? हे आजही कळल नाही (बदनामीच म्हणजे) रात्री अपरात्री मी एकटी रहाते म्हटल्यावर दाराची बेल वाजवून पळून जायचय. तुला उध्वस्त करेन , घरातून बाहेर कशी पडतेस बघतोच मी..? अशा धमक्या..! बरं त्यातही गम्मत अशी की हा फोटो आम्हाला का पाठवला ? हे विचारण्याची कोणालाही हिम्मत झाली नाही की  अशी एखाद्याची बदनामी करू नका.. अस विचारण्याची. माज्या मनात एकच विचार आला ‘विकृत’...!   डिप्रेशन मध्ये पुन्हा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. खूप वेळ लागला या सगळ्यातून बाहेर पडायला.   

Web Title: marathi actress megha ghadge facebook post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.