अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:37 IST2025-01-11T10:36:58+5:302025-01-11T10:37:23+5:30
आतादेखील एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे.

अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल
आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
सेलिब्रिटी कट्टा या इन्स्टाग्राम पेजवरुन अभिनेत्रीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री भाकऱ्या थापून चुलीवर भाजताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मीरा जगन्नाथ आहे. मीराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "खूप वर्षांनी भाकरी बनवली", असं मीरा या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.
मीरा 'इलू इलू १९९८' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने टीम कोल्हापूरला गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईचं टीमने दर्शन घेतलं. त्यानंतर एका हॉटेलमध्ये अभिनेत्री मीराने भाकऱ्या थापल्या. मीरा या सिनेमात हेमा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित 'इलू इलू' सिनेमा ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.