'पास्ता अन् ही मुलगी अजिबात आवडत नाही' नेटकऱ्याच्या खोचक कमेंटवर मिताली मयेकरनं दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:07 PM2024-07-01T18:07:26+5:302024-07-01T18:08:09+5:30
नुकतंच मितालीने एक व्हिडीओ शेअर केला.
मराठी कलाविश्वातील कायम चर्चेत येत असलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी ही जोडी त्यांच्या अफलातून केमिस्ट्रीमुळेही चर्चेत येत असते. हे दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून कायम पोस्ट शेअर करत असतात. चाहते त्यांचं कौतुक करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. पण, तरीही ट्रोल करणारे लोक काही कमी नसतात. नुकतंच मितालीने एक व्हिडीओ शेअर केला. यावर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली. पण, मितालीनेही आपल्या हटके स्टाईलमध्ये त्याची बोलती बंद केली.
मिताली आणि तिचा पती सिद्धार्थ चांदेकर हे नुकतेच युरोप टूरवर आहे. नुकतेच दोघांनी स्पेनमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत. सिद्धार्थ तर नेहमीप्रमाणेच कूल लुकमध्ये दिसतोय तर मितालीचा सुद्धा एकदम सुंदर दिसतेय. यातच मितालीने पास्ता खातानाचा एक व्हिडीओ शेअर केला.
कॅप्शनमध्ये तिने लिहलं, 'तुम्ही इटलीमध्ये पास्ता खाता तेव्हा'. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने 'सॉरी पण, मला पास्ता आणि ही मुलगी आवडत नाही' अशी खोचक कमेंट केली. यावर मितालीने देखील जशास तसं उत्तर देत लिहलं, 'याचा अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीची चव तुम्हाला समजतच नाही'. यासोबतच तिने हसण्याचे इमोजी शेअर केले.
याशिवाय मितालीने ट्रोलर्सबद्दल लिहलं, "ज्यांनी माझ्या कॅप्शनचा अर्थ समजून न घेता… मला पास्ता आवडला नाही असा भ्रम करून घेतलाय. त्या सगळ्याचं कौतुकचं केलं पाहिजे. विशेष म्हणजे काहीजण या पास्ताला नूडल्स म्हणत आहेत. या पास्ताला ‘Pici’ म्हणतात आणि पास्ताचा हा प्रकार स्पेगेटी पास्तापेक्षा जरा जाड असतो. मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण आज काहीतरी नवीन शिकलात चिअर्स!" या पोस्टमुळे मिताली सध्या चर्चेत आहे.