दारापुढे शेती अन् लाकडी बांधकाम; मृण्मयी देशपांडेच्या महाबळेश्वरमधील घराची Inside झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 17:33 IST2023-05-12T17:31:51+5:302023-05-12T17:33:23+5:30
Mrunmayee deshpande: गेल्या काही महिन्यांपूर्वी मृण्मयी पुण्यातील प्रशस्त घर सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. तिच्यासोबत तिची बहीण गौतमीदेखील राहात आहे.

दारापुढे शेती अन् लाकडी बांधकाम; मृण्मयी देशपांडेच्या महाबळेश्वरमधील घराची Inside झलक
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande). उत्तम अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे अभिनेत्री म्हणून कलाविश्वात वावरत असतानाच तिने दिग्दर्शकीय क्षेत्रातही पदार्पण केलं. मन फकीरा हा तिने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा असून कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करत असतानाच तिने मुंबई-पुण्यासारखी महत्वाची शहरं सोडून थेट महाबळेश्वरला स्थायिक झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी मृण्मयी पुण्यातील प्रशस्त घर सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. तिच्यासोबत तिची बहीण गौतमीदेखील राहात आहे. त्यामुळे बऱ्याचदा या दोघी या घरातून त्यांचे व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच मृण्मयीने एक पेड प्रमोशनसाठी व्हिडीओ केला. मात्र, या व्हिडीओमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळाली.
दरम्यान, मृण्मयीने तिच्या या घरात लाकडी वस्तू आणि लाकडी सामानांवर जास्त भर दिला आहे. तसंच हे घर तिने तिच्या पद्धतीने डेकोरेट केल्याचं दिसून येत आहे.