'तुम्हाला संस्कार नाहीत'; नवऱ्यासोबत लिपलॉक केल्यामुळे मृण्मयी देशपांडे ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:35 PM2023-12-05T12:35:14+5:302023-12-05T12:35:40+5:30
Mrunmayee deshpande: अनेकांनी तिला संस्कृती जपण्याचा सल्ला दिला आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवऱ्यासोबत लीपलॉक करतानाचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने नवऱ्याला अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, तिचा हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
मृण्मयी बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटोंना नेटकरी पसंतीही देतात. परंतु, यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलं सुनावलं आहे. इतकंच नाही तर तिला संस्कृती जपण्याचे सल्लेही दिले आहेत.
मृण्मयीने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, या सगळ्यात तिचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. अनेकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
'हे तुझे एकांतातले क्षण,दुसर्यांना दाखवण्यासाठी नसतात. तु साधी मुलगी आहेस अशी उथळ वागू नकोस', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'ही आपली संस्कृती नाही. आपल्या बायकांनी असे केलेलं शोभत नाही. तुम्ही सगळे परदेशी विचारधारणामुळे बिघडत चालले आहात. तुम्हाला संस्कार नाहीत', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
इतकंच नाही तर, 'काय फालतूगिरी आहे प्रेम आहे तर सगळ्यांना सांगायची काय गरज?', 'मराठी कलाकार आहात मराठी संस्कृती जोपासा, हल्ली प्रेम जगजाहीर करायची फॅशनच झाली. चांगल म्हणता म्हणता काहीतरी अस करायच', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.