बिकिनी घालण्यास नकार दिल्यामुळे हातातून निसटला बॉलिवूड चित्रपट, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:28 PM2023-10-12T13:28:41+5:302023-10-12T13:29:24+5:30
"त्यांनी मला बिकिनी घालायला सांगितलं म्हणून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूड चित्रपटाचा अनुभव
नयना आपटे या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. गेली जवळपास ४ दशके त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. 'लग्नाची बेडी', 'देव देव्हाऱ्यात नाही', 'एकच प्याला', 'करायला गेलो एक' अशा अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठीबरोबरच हिंदी आणि गुजराती सिनेसृष्टीतही नयना आपटे यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवू्डमधील धक्कादायक अनुभव सांगितला.
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नयना आपटे यांच्या हातून रामानंद सागर यांचा बॉलिवूड चित्रपट निसटला होता. बिकिनी घालण्यास नकार दिल्यामुळे नयना आपटे यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव शेअर केला. या मुलाखतीत त्यांना रिजेक्शनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी बॉलिवूडमधील हा अनुभव सांगितला.
"रामानंद सागर यांच्या चरस या चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं होतं. त्यात धर्मेंद आणि हेमा मालिनीही काम करणार होते. तुम्हाला बिकिनी आणि स्विमिंगसूट घालावा लागेल. ही भूमिकेची गरज आहे, असं मला सांगण्यात आलं होतं. मी त्यांना कंम्फर्टेबल नाही. त्यामुळे मी हे करणार नाही, असं स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हा बिकिनी घालण्यास नकार दिल्यामुळे माझं रिजेक्शन झालं होतं," असं नयना आपटे यांनी सांगितलं.
सध्या नयना आपटे सोनी मराठीवरील एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' या नव्या कोऱ्या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.