'हा' होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवडता पदार्थ; निवेदिता सराफ यांनी सांगितली लक्ष्याची आवडती डिश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:59 PM2023-05-19T17:59:42+5:302023-05-19T18:00:13+5:30

Laxmikant berde: लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं. सोबतच लक्ष्मीकांत यांचा आवडता पदार्थ कोणता हेदेखील सांगितलं.

marathi actress nivedita saraf remembers the late actor laxmikant berde | 'हा' होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवडता पदार्थ; निवेदिता सराफ यांनी सांगितली लक्ष्याची आवडती डिश

'हा' होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवडता पदार्थ; निवेदिता सराफ यांनी सांगितली लक्ष्याची आवडती डिश

googlenewsNext

आपल्या सदाबहार अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे(Laxmikant Berde). आज त्यांचं निधन होऊन बरीच वर्ष लोटली. मात्र,तरीदेखील चित्रपटांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. म्हणूनच, सोशल मीडियावर कायम त्यांच्याविषयीचे किस्से रंगत असतात. यात सध्या त्यांच्या आवडत्या पदार्थाची चर्चा रंगली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं. सोबतच लक्ष्मीकांत यांचा आवडता पदार्थ कोणता हेदेखील सांगितलं. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत यांना आवडणारा पदार्थ ते दिवस-रात्र कोणत्याही वेळी सहज खाऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राची सून शोभतेस! जेनेलियाला आवडतात 'हे' महाराष्ट्रीन पदार्थ

लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ जवळपास १० वर्ष एकमेकांचे शेजारी म्हणून राहत होते. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. लक्ष्यासोबत मी अनेक वर्ष नाटक, सिनेमात काम केलं. त्याला एक पदार्थ अतिशय आवडायचा. म्हणजे सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवणात आणि संध्याकाळी चहाच्या वेळी वा रात्री जेवताना कधीही त्याला हा पदार्थ दिला तरी तो आवडीने तो खायचा. तो पदार्थ म्हणजे खोबऱ्यातली सुरमई.

याला म्हणतात खरा 'धडाकेबाज'; हाताला बंदुकीची गोळी लागलेली असतानाही लक्ष्याने दिला परफेक्ट शॉट

'ही गाडी तोडून टाका'; चाहत्यांच्या कृतीमुळे वैतागले होते लक्ष्मीकांत बेर्डे

दरम्यान, निवेदिता सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यात अशी ही बनवाबनवी, थरथराट, धुमधडाका यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.
 

Web Title: marathi actress nivedita saraf remembers the late actor laxmikant berde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.