"प्रिय अनिकेत, तू ज्या पद्धतीने...", निवेदिता सराफ यांची लेकासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:34 IST2023-04-21T14:30:49+5:302023-04-21T15:34:08+5:30

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये.

Marathi actress nivedita saraf share special post for son aniket birthday | "प्रिय अनिकेत, तू ज्या पद्धतीने...", निवेदिता सराफ यांची लेकासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या...

"प्रिय अनिकेत, तू ज्या पद्धतीने...", निवेदिता सराफ यांची लेकासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या...

अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांना मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हटले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेतचा आज वाढदिवस आहे.  यानिमित्ताने निवेदिता सराफ यांनी लेकासाठी एक खास पोस्ट केली आहे.

 निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ आणि अनिकेत सराफ यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना निवेदिता यांनी अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आज आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, कारण आज तुझा वाढदिवस आहे. प्रिय अनिकेत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अपार मेहनत, संवेदनशीलता, विनोदबुद्धी आणि विश्वासाच्या जोरावर तू ज्या पद्धतीने स्वत:च्या पायावर उभा राहिलास, त्याबाबत आम्हाला तुझा अभिमान वाटतो. खूप खूप प्रेम”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.

दरम्यान बॉलिवूड अथवा मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टारची मुलं आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच क्षेत्रात करियर करताना दिसतात. केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्याला तोच ट्रेंड पाहायला मिळतोय. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया, महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद, निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करत आहेत आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे. पण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. अनिकेत हा शेफ आहे.

 

Web Title: Marathi actress nivedita saraf share special post for son aniket birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.