कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:57 IST2023-12-10T15:55:35+5:302023-12-10T15:57:32+5:30
Marathi actress: या अभिनेत्रीसोबत रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेदेखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूरच्या बाजारात रमली मराठमोळी अभिनेत्री; बांगड्या घेणाऱ्या 'या 'अभिनेत्रीला ओळखलं का?
सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात खासकरुन सेलिब्रिटींच्या पोस्टला सर्वाधिक पसंती मिळते. ही सेलिब्रिटी मंडळी सुद्धा सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाइफचे अपडेट्सही चाहत्यांना देत असतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ती पाठमोरी दिसत असून बांगड्यांच्या दुकानात उभी आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे आहे.
सध्या पर्ण कोल्हापुरात असून तिने येथील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. इतकंच नाही तर तिच्यासोबत अभिनेत्री कादंबरी नाईक, रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रीही दिसून येत आहेत.
दरम्यान, सध्या पर्ण 'चारचौघी' या नाटकात काम करत आहे. त्यामुळे या नाटकाच्या निमित्ताने ती वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करत आहे. या नाटकात तिच्यासोबत कादंबरी नाईक, रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या अभिनेत्री झळकत आहेत.