गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 13:50 IST2023-12-29T13:50:15+5:302023-12-29T13:50:56+5:30
Pooja sawant: पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार आहे.

गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत आगामी वर्षात लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान आता लग्नापूर्वी ती मराठी कलाविश्वातील तिचे मित्र मंडळी भूषण प्रधान, प्रार्थना बेहरेसोबत गोव्यात व्हॅकेशनसाठी गेली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत सध्या सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. सिद्धेश चव्हाण याला पूजा डेट करत असून लवकरच त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी पूजा गोव्याला व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. विशेष म्हणजे गोव्यामध्ये पूजाने बॅचलर पार्टीही केली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजाने तिच्या गोवा डायरीमधील काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. या नुकत्याच केलेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या दणक्यात तिची आणि सिद्धेशची बॅचलर पार्टी झाली. विशेष म्हणजे तिच्या भावंडांनी आणि मित्रपरिवाराने मिळून तिला ही सरप्राइज पार्टी दिली आहे.
या पार्टीमध्ये तिच्यासोबत तिची बहिण रुचिरा, भाऊ श्रेयस, प्रार्थना बेहरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकर, भूषण प्रधान असा जवळचा मित्रपरिवार सहभागी झाला आहे.