पूजा सावंतचं लग्न कधी? 'त्या' पोस्टमुळे झालं स्पष्ट, लवकरच होणार मिसेस चव्हाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 02:33 PM2024-01-26T14:33:23+5:302024-01-26T14:34:18+5:30

काल पूजाने तिचा 34 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिला कलाकार, चाहते सर्वांनीच शुभेच्छा दिल्या.

marathi actress Pooja Sawant going to be mrs chavhan in next month post viral | पूजा सावंतचं लग्न कधी? 'त्या' पोस्टमुळे झालं स्पष्ट, लवकरच होणार मिसेस चव्हाण!

पूजा सावंतचं लग्न कधी? 'त्या' पोस्टमुळे झालं स्पष्ट, लवकरच होणार मिसेस चव्हाण!

मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा झाल्याचं सांगत तिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना सरप्राईज दिलं. सिद्धेश हा ऑस्ट्रेलियात स्थायिक असून त्याचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध नाही. दोघंही अरेंज मॅरेजसाठी भेटले आणि प्रेमात पडले. पूजा आता लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर याचंही उत्तर एका पोस्टमधून मिळालं आहे. काय आहे ती पोस्ट बघा.

काल पूजाने तिचा 34 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिला कलाकार, चाहते सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. मराठी दिग्दर्शक चंद्रकांत कानसे यांचीही पोस्ट व्हायरल होते. या पोस्टमधून त्यांनी पूजा पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याचं स्पष्ट लिहिलं आहे. त्यांनी त्यांच्या बायकोसोबत पूजाचा फोटो शेअर करत लिहिले, "वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन बायका, माफ करा एक बाई आणि दुसरी पुढच्या महिन्यात होऊ घातलेली बाई... बाईचं  नाव रेणुका आणि होऊ घातलेलीच नाव पूजा... नीट बघाल तर दोन्ही नावं देविंशी संबंधित, देवीच म्हणाना... तर, या दोन देव्या माझ्या आयुष्यात आल्या, एक जिवाभावाची प्राणप्रिय बायको म्हणून तर दुसरी जिवाभावाची प्राणप्रिय मैत्रीण म्हणून...

एवढं सगळं लिहिण्याच कारण आज माझ्या जिवाभावाच्या प्राणप्रिय मैत्रिणीचा शेवटचा वाढदिवस, माफ करा माफ करा, स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस... पुढच्या महिन्यात तीच लग्न आहे म्हणून स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस असं म्हणालो... तर तिला या स्वतंत्र वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

पुढच्या वर्षीपासून बंधनातल्या शुभेच्छा देईन... कारण पुढच्या वर्षीपासून नवरा नावाचं बंधन गळ्यात असेल तुझ्या म्हणून आज स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस मनाप्रमाणे जगून घे, खूप मज्जा कर, धुडगूस घाल... तशी तू बंधन मानणारी आणि कोणाला घाबरणारी ( मलासोडून) मुलगी नाहीस तरीही नवरा नामक धाक हा थोडासा का असेना असतोच...

 आता म्हणाल लिहायचं तर मैत्रिणीबद्दल होतं तर बायकोचा दिखावा कशाला तर आपल्या पेक्षा अवाजवी महत्त्व दुसऱ्या मुलीला दिले तर बायको नामक प्राणी कुठल्याही थराला जाऊ शकतो.. (माझी बायको तशी नाही ती माझ्या धाकात आहे असे फक्तं आणि फक्तं मीच मानतो)
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूजा..!"

पूजाने या पोस्टवर कमेंट करत चंद्रकांत कानसे यांचे आभार मानले आहेत. ती लिहिते,'किती सुरेख लिहीले आहे .. आणि फक्त तुम्हीच हे करू शकता. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे शब्दात सांगण्याची गरज नाही. नेहमी माझ्यासोबत राहा!

Web Title: marathi actress Pooja Sawant going to be mrs chavhan in next month post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.