"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 17:04 IST2023-12-31T17:03:56+5:302023-12-31T17:04:18+5:30
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन २०२३ मधील या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण अभिनेत्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे.

"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
पूजा सावंत ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पूजाने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे काही फोटो शेअर करत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पूजाने तिची लव्हस्टोरीही सांगितली होती. आता पूजाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पूजाचा होणारा नवरा तिला प्रपोज करताना दिसत आहे.
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन २०२३ मधील या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण अभिनेत्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. "परीकथांवर विश्वास ठेवणं मी बंद केलं होतं. 'a perfect guy' हे फक्त वाक्य आहे असं मला वाटलं होतं. पण, मग मी सिद्धेशला भेटले...माझ्या परीकथेतील माझा मिस्टर परफेक्ट. हा व्हिडिओ मी आज शेअर करत आहे. कारण, २०२३मधील क्षण नव्हे तर या १.२० मिनिटांत माझं अख्ख आयुष्य आहे," असं पूजाने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "तुझ्याबरोबर २०२४ची सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. उत्सुकता, अस्वस्थता आणि रोमांच आहे...पण, काळजी नाही. कारण, मला माहितीये तू माझ्याबरोबर आहेस. लव्ह यू मिस्टर चव्हाण." तिच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.