Prajakta Mali : ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून...; मराठमोळ्या प्राजक्ता माळीनं ‘लंडनवारी’वर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 03:43 PM2022-09-28T15:43:09+5:302022-09-28T15:45:45+5:30

गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेऊन प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लंडनला गेली आहे. पण लंडनमध्ये...

marathi actress prajakta mali criticize london share post | Prajakta Mali : ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून...; मराठमोळ्या प्राजक्ता माळीनं ‘लंडनवारी’वर शेअर केली पोस्ट

Prajakta Mali : ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून...; मराठमोळ्या प्राजक्ता माळीनं ‘लंडनवारी’वर शेअर केली पोस्ट

googlenewsNext

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते लाडक्या प्राजक्ताला नक्कीच मिस करत असतील. खरं तर प्राजक्ताची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाहीये. गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेऊन प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लंडनला गेली आहे. पण लंडनमध्ये तिचं मनं रमेना झालंय. तिला मायभूमीची प्रचंड आठवण येत आहे. प्राजूची ताजी पोस्ट वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल.
ने मजसी ने परत मातृभीला... सागरा प्राण तळमळला म्हणत, तिने एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताची पोस्ट
ने मजसी ने परत मातृभीला….
सागरा प्राण तळमळला…
भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल.. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो…
एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही…
त्याला अनेक कारणं आहेत..,
१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?.
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत.. इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)
काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती.
असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले.
फक्त २ दिवस बाकी.. आलेच…
थेंब्स नदीच्या काठावर…., अशी लांबलचक पोस्ट प्राजक्ताने शेअर केली आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनीही नेहमीप्रमाणे भरभरून कमेंट्स केल्या आहेत. प्राजू, मला मनापासून वाटलं होतं तुला जास्त दिवस राहिली की करमणार नाही. तुझ्या बोलण्यातूनचं जाणवतं तुझं आपल्या मातृभूमीवर किती प्रेम आहे ते, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. लवकर ये प्राजू, अशा कमेंट्सचा तर पूर आला आहे.
 

Web Title: marathi actress prajakta mali criticize london share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.