प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती माहितीये? राहायला जायचं असेल तर तयार ठेवा हजारो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 01:17 PM2023-10-03T13:17:45+5:302023-10-03T13:18:18+5:30
Prajakta mali: प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर तुम्हीही राहायला जाऊ शकता; पण त्यासाठी मोजावे लागतील हजारो रुपये
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने गेल्या काही दिवसांमध्ये मोठी झेप घेतल्याचं दिसून येत आहे. केवळ अभिनय क्षेत्रच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याहीने तिने बरीच प्रगती गेली आहे. त्यामुळे अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिका अशी नवीन ओळख तिने निर्माण केली आहे. प्राजक्तराजया दागिण्यांच्या ब्रँडनंतर प्राजक्ताने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने एक फार्महाऊस खरेदी केलं. हे फार्महाऊस आता तिने पर्यटकांसाठी खुलं केलं असून त्याचं एका दिवसाचं भाडं किती हे जाणून घेऊयात.
प्राजक्ताने कर्जत येथे नुकताच तिच्या नव्या फार्महाऊसचा शुभारंभ केला. काही दिवसांपूर्वी या फार्महाऊसला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सगळ्या टीमने भेट दिली होती. या फार्महाऊसवर सगळ्यांनी धम्मालमस्ती केली. त्याचे काही फोटो, व्हिडीओही या कलाकारांनी शेअर केले होते. तेव्हापासून प्राजक्ताच्या या फार्महाऊसची प्रचंड चर्चा रंगली आहे. यात खासकरुन या फार्महाऊसचं भाडं किती हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
किती आहे प्राजक्ताच्या फार्महाऊसचं भाडं?
प्राजक्ताने तिचं फार्महाऊस भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात येतं. ३ बीएचके व्हिला असलेल्या या फार्महाऊसचं भाडं प्रचंड जास्त असून जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर त्यासाठी खिश्यात बक्कळ पैसे असणं गरजेचं आहे. प्राजक्ताने सध्या तिचं फार्महाऊस Stay Leisurely यांच्याकडे हँडओव्हर केलं आहे. त्यांच्या ऑफिशिअल साईटवर या फार्महाऊसची सगळी माहिती देण्यात आली असून त्याचं एक दिवसाचं भाडं किती हेदेखील सांगण्यात आलं आहे.
प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव 'द ग्रीन मोन्टाना' असं असून या फार्महाऊसवर एकाचवेळी १५ पेक्षा जास्त व्यक्ती राहू शकतात. तसंच केवळ २ व्यक्तींसाठीदेखील हा फार्महाऊस उपलब्ध आहे. परंतु, यासाठी बरीच मोठी रक्कम मोजावी लागेल. जर इथे दोन व्यक्तींना एक रात्र रहायचं असेल तर त्यासाठी २० हजार २५० रुपये इतके पैसे मोजावे लागतील. तसंच ६ हजार रुपये टॅक्स आणि इतर खर्च वर मोजावे इतकंच नाही तर जेवणाचा खर्चदेखील तुम्हाला वेगळा करावा लागेल.
कुठे आणि किती मोठं आहे प्राजक्ताचं फार्महाऊस?
कर्जतमधील गौळवाडी या गावात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये ३ बेडरूम्स, हॉल, किचन स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टींची सोय आहे. तसंच वेळप्रसंगी तुम्ही बाजुच्या हॉटेल्समधून जेवणदेखील मागवू शकता. मात्र, त्यासाठी काही नियम व अटी लागू आहेत.