‘रानबाजार’साठी Prajaktta Maliनं वाढवलं होतं इतकं किलो वजन, आता मात्र 61 वरून 54 वर...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 14:59 IST2022-05-29T14:56:39+5:302022-05-29T14:59:17+5:30
Prajaktta Mali :‘रानबाजार’ या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली...

‘रानबाजार’साठी Prajaktta Maliनं वाढवलं होतं इतकं किलो वजन, आता मात्र 61 वरून 54 वर...!!
प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) ही सर्वांची लाडकी व लोकप्रिय मराठी अभिनेत्री. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता ‘रानबाजार’ (RaanBaazaar) या तिच्या सीरिजमुळे बरीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ताचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार दिसला. या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. या सीरिजमध्ये तिने रत्ना या वारांगणेची भूमिका साकारली आहे. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली. अगदी वजनही वाढवलं.
पहिल्यांदा ‘रानबाजार’ स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा तिला ती प्रचंड आवडली होती. पण प्रेक्षक आपल्या भूमिकेला कसं स्वीकारतील, ही भीती मला पहिल्या दिवसापासून तिच्या मनात होती. शिवाय या सीरिजसाठी तिला वजन सुद्धा वाढवायचं होतं. ‘65 किलोंची पाहिजेस तू मला. बेढब दिसली पाहिजे, वाकडीतिकडी दिसली पाहिजेस,’असं दिग्दर्शकांनी तिला पहिल्याच दिवशी बजावलं होतं. तेव्हा प्राजक्ता 50 किलोची होती. मरमर करून तिने वजन कमी केलं होतं. ते पुन्हा वाढवावं लागणार म्हटल्यावर तिला चांगलीच धडकी भरली होती. अर्थात इतकी सुंदर भूमिका तिला हातची जाऊ द्यायची नव्हती, म्हणून ती वजन वाढवायलाही तयार झाली होती.सीरिजसाठी तिने तब्बल 11 किलो वजन वाढवलं.
सीरिजचं शूटींग संपली आणि वाढलेलं वजन पुन्हा एकदा कमी करण्याचं चॅलेंज प्राजक्ताने स्वीकारलं. आता तिने 7 किलो वजन कमी केलं आहे. याबाबतची एक पोस्ट प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका बाजूला ‘रानबाजार’चा फोटो पोस्ट केला आणि दुस-या बाजूला आत्ताचा वजन कमी केल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे. यात तिच्या लुकमधला फरक स्पष्ट दिसतोय. 61 किलोंवरून 54 किलो... ‘रानबाजार’मधील रत्ना साकारण्यासाठी 11 किलो वजन वाढवलं होतं. सहा महिन्यांत नैसर्गिक पद्धतीने मी माझं वजन कमी केलं. आता लक्ष्य आहे 51 किलो, असं ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिलं आहे.
तिच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत, तिचं कौतुक केलं आहे. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर अशा सेलिब्रिटींनीही तुझा अभिमान वाटतो, अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.