Video: प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली! पवित्र स्नान करुन अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:33 IST2025-02-09T12:32:52+5:302025-02-09T12:33:18+5:30
प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचून तिथे आलेला अनुभव प्राजक्ताने व्हिडीओच्या माध्यमातून शब्दबद्ध केलाय (prajakta mali)

Video: प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहोचली! पवित्र स्नान करुन अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...
सध्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची (mahakumbhmela 2025) चांगलीच चर्चा आहे. फक्त भारतातील नव्हे तर जगभरातील भाविक महाकुंभमेळ्याला हजेरी लावत आहे. सामान्य माणसांपासून राजकारणी सेलिब्रिटीही महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवत पवित्र स्नानाचा आनंद घेत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (prajakta mali) नुकतीच प्रयागराजयेथील (prayagraj) महाकुंभमेळ्याला जाऊन हजेरी लावली. प्राजक्ताने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला.
प्राजक्ताने सांगितला महाकुंभमेळ्याचा भारावणारा अनुभव
"तीर्थराज - प्रयागराज #महाकुंभ#२०२५ लहानपणापासूनच कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोचले.) Once in a lifetime experience." अशा शब्दात प्राजक्ताने तिचा अनोखा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत प्राजक्ताने महाकुंभमेळ्याला आवर्जुन हजेरी लावली. प्राजक्ताने या संपूर्ण प्रवासाचा व्हिडीओही शेअर केलाय. प्राजक्ताचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.
प्राजक्ताचं वर्कफ्रंट
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये आलेल्या 'फुलवंती' सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ता माळीने चांगलंच नाव कमावलं. सिनेमा लोकप्रिय झालाच शिवाय प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेचं आणि नृत्याचंही खूप कौतुक झालं. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. शिवाय ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित आगामी 'चिकी चिकी बुबुम बुम' या मराठी सिनेमामध्ये झळकणार आहे. २८ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.