Prajakta Mali : “....नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही”, प्राजक्ता माळी ‘त्या’ व्हिडीओमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:55 PM2023-02-28T14:55:52+5:302023-02-28T14:58:09+5:30

Prajakta Mali : होय, प्राजूचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला...

Marathi Actress Prajakta Mali Sharing Yoga Video Trolled by users | Prajakta Mali : “....नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही”, प्राजक्ता माळी ‘त्या’ व्हिडीओमुळे झाली ट्रोल

Prajakta Mali : “....नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही”, प्राजक्ता माळी ‘त्या’ व्हिडीओमुळे झाली ट्रोल

googlenewsNext

सालस, सोज्वळ सून म्हणून झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) अनेकदा योगासन करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच असाच एक व्हिडीओ तिने शेअर केला. पण या व्हिडीओमुळे प्राजक्ताला ट्रोल व्हावं लागलं. होय, प्राजूचा अष्टांग योगा करतानाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुळात प्राजक्ताने व्हिडीओची सुरूवात केली तीच मुळी इंग्रजीतून. मग काय, तिची ही सुरूवात अनेकांना खटकली. काहींना तिच्या लाईव्ह सेशनची वेळ खटकली. मग काय अनेकांनी प्राजूला ट्रोल केलं.

मॅडम मराठीमध्ये बोला नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही, अशी कमेंट एका युजरने केली. १० वाजता कोणता योगा असतो प्राजू, असा प्रश्न एकाने केला. 1 तास 40 मिनिटांचा व्हिडीओ आम्ही बघावा अशी अपेक्षा आहे का तुमची, अशी कमेंटीही एका युजरने केली. विना मेकअपची दारू प्यायल्यासारखी वाटत आहे, अशा शब्दांत एका युजरने प्राजक्ताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो होस्ट करताना दिसते. अनेकदा शोमधील कलाकार प्राजक्ताची सेटवर फिरकी घेताना दिसतात. सोशल मीडियावरही प्राजक्तावरचे मीम्स व्हायरल होताना दिसतात. प्राजक्ता स्वत:वरचे हे सगळे विनोद खिलाडूवृत्तीनं स्वीकारते. प्रत्येकाला खळखळून हसत दाद देते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  प्राजक्ताने मालिकांबरोबरच चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. ‘रानबाझार’ ही तिची वेब सीरिज चांगलीच गाजली होती.

Web Title: Marathi Actress Prajakta Mali Sharing Yoga Video Trolled by users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.