राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर प्राजक्ता माळी काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 07:48 PM2024-01-05T19:48:42+5:302024-01-05T19:51:39+5:30

प्राजक्ता राजकारणात जाणार असल्याचीही बरेचदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

marathi actress prajakta mali talk about his political entry in maharashtra | राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर प्राजक्ता माळी काय म्हणाली...

राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावर प्राजक्ता माळी काय म्हणाली...

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. नेहमीच ती तिच्या हटके फोटोंनी अनेकांना घायाळ करते. प्राजक्ता राजकारणात जाणार असल्याचीही बरेचदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच प्राजक्ताने राजकारणात प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडलं. 

 राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळी म्हणाली, मी खुप भावनिक आहे, त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही.  थोरा-मोठ्याच्या भेटी घेतल्या पाहिजेत. म्हणून मी कार्यक्रमांना गेले होते. मला असं वाटतं की पॉवरफुल लोकांशी संबंध चांगले ठेवावेत. नाहीतर आपण पॉवरफुल व्हावं. सध्या मी दोन्ही करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय अजेंडा असा काहीच नाही. अजिबात राजकारणात जाण्याची सध्या तरी इच्छा नाही. भविष्यातलं काही सांगू शकत नाही'. 

प्राजक्ताने गेल्या वर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्त्रपुजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते. तसेच तिने यासंदर्भात एक पोस्टही शेअर केली होती. यानंतर प्राजक्ताची ही पोस्ट पाहून अनेकांच्या भूवय्या उंचावल्या होत्या. यानंतर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. 

प्राजक्ता माळीला आपण आजवर विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. तर फक्त अभिनेत्री नसून आता तिनं उद्योजिका म्हणून नवं काम सुरू केलं आहे. तिचा प्राजक्तराज हा तिचा दागिन्यांचा ब्रँड आहे. यातून ती दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी इतिहासकालीन दागिने पुन्हा एकदा नव्याने उपलब्ध करून देते.
 

Web Title: marathi actress prajakta mali talk about his political entry in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.