Video: प्राजक्ताला करायचं होतं सलमान खानसोबत लग्न; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:10 IST2023-04-17T15:09:07+5:302023-04-17T15:10:16+5:30
Prajakta mali: प्राजक्ताने तिच्या सेलिब्रिटी क्रशविषयी भाष्य केलं आहे.

Video: प्राजक्ताला करायचं होतं सलमान खानसोबत लग्न; पण...
लोकप्रिय अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास करणारी मराठीमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या प्राजक्ताने स्वत:चा प्राजक्तराज हा नवा दागिन्यांचा ब्रँडही सुरु केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या ती सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने अभिनेता वैभव तत्ववादी माझा क्रश होता असं म्हटलं होतं. मात्र, आता वैभव नव्हे तर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता तिचा खरा क्रश होता हे तिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
अलिकडेच प्राजक्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यात तिचा पहिला फसलेला पदार्थ, पहिल्यांदाच चुकलेला आऊटफिट अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच तिने तिच्या क्रशचं नाव सांगितलं. अर्थात तिचा हा क्रश ती लहान असतानाचा होता हे तिने आवर्जुन सांगितलं.
तुझा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला होता. त्यावर जराही वेळ न लावता तिने सलमान खानचं नाव घेतलं. मी अगदीच १-२ वर्षांची होती. त्यावेळी माझा आतेभाऊ सलमान खान फार मोठा चाहता होता. त्याने मला शिकवलं होतं, की सलमान खान छान आहे. त्यामुळे मी सारखं म्हणायचे मला सलमान खानशी लग्न करायचंय, असं उत्तर प्राजक्ताने दिलं.
दरम्यान, प्राजक्ताने तिच्या लहानपणीची आठवण सांगत सलमानला तिचं क्रश असल्याचं म्हटलं. प्राजक्ता आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अल्पावधीत तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. इतकंच नाही तर दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.