‘चालायचा संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय...’, प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 14:51 IST2022-04-17T14:50:16+5:302022-04-17T14:51:39+5:30
Prajaktta Mali : प्राजक्तानं वेस्टर्न ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटो कमाल आहेत पण त्यापेक्षा या फोटोवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्स धम्माल आहेत.

‘चालायचा संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय...’, प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स
Prajaktta Mali Photoshoot : छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali)अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये. सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. होय, फोटो कमाल आहेत पण त्यापेक्षा या फोटोवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्स धम्माल आहेत.
प्राजक्तानं वेस्टर्न ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या ड्रेसमध्ये ती विविध पोझ देताना दिसतेय. तिची एक एक पोझ घायाळ करणारी आहे. ‘ बाबूजी धीरे चलना...प्यार में जरा...,’असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. मग काय? या कॅप्शनला चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी उत्तरं दिलीत.
चालायचं संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय..., अशी कमेंट प्राजक्ताच्या एका चाहत्याने केली. दुसºया चाहत्याने तर चांगलंच मजेशीर उत्तर दिलं. ‘धीरे ही चल रहे है. कार बेच कर सायकल ली है, और कितना धीरे चले...,’अशी कमेंट त्याने केली. एका चाहत्याने तर ‘मला तुझ्याशी लग्न करायचेय,’ म्हणत थेट प्राजूला लग्नाची मागणीच घातली आहे. प्राजुजी धीरे चलना... आपके प्यार में गिरने से संभालना..., अशी कमेंट अन्य एकाने केली आहे. ‘नको ना असे फोटो अपलोड करूस इन्स्टावर,’अशी गोड विनंती एका चाहत्याने केली आहे. एकंदर काय तर प्राजक्ताच्या या फोटोंनी इंटरनेटवर नुसती आग लावली आहे.
प्राजक्ता नुकतीच पावनखिंड या सिनेमात दिसली होती.काही दिवसापूर्वी तिनं आईसोबत परदेश वारी केली. याचे फोटो देखील प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले होते.