बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही प्रिया बापटचा थाट; पाहा अभिनेत्रीची मेकअप व्हॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 17:29 IST2022-07-25T17:28:31+5:302022-07-25T17:29:00+5:30
Priya bapat: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने नुकताच तिच्या मेकअप व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने व्हॅनमध्ये गेल्यानंतर मेकअपची कशी तयारी करते याची एक झलक दाखवली आहे.

बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही प्रिया बापटचा थाट; पाहा अभिनेत्रीची मेकअप व्हॅन
मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच मस्तीखोर अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा कितीतरी माध्यमांमधून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सध्या प्रिया तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी असून या सेटवरील फोटो, व्हिडीओ ती वरचेवर शेअर करत असते. यामध्येच तिने तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचीही ही व्हॅन कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नसल्याचं यात पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने नुकताच तिच्या मेकअप व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने व्हॅनमध्ये गेल्यानंतर मेकअपची कशी तयारी करते याची एक झलक दाखवली आहे. विशेष म्हणजे तिची ही व्हॅन सुसज्ज असून यात प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक सेट केल्याचं दिसून येतं.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये प्रियाचा मस्तीखोर अंदाजही पाहायला मिळत आहे. प्रिया मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर तिने स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तसंच आजवरच्या कारकिर्दीत ती अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.