Video: आई फूलों के रस में नहा के! अंगावर फुलं उधळून रिंकूने केली सोशल मीडियावर हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:24 IST2023-03-14T15:23:23+5:302023-03-14T15:24:48+5:30
Rinku rajguru: रिंकू कलाविश्वात जितकी सक्रीय आहे. तितकीच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे ती चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: आई फूलों के रस में नहा के! अंगावर फुलं उधळून रिंकूने केली सोशल मीडियावर हवा
नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या 'सैराट' (sairat) या सिनेमाचं नाव घेतलं की पटकन डोळ्यासमोर येतो तो आर्ची आणि परश्याचा चेहरा. सैराटमधून या जोडीने सिनेविश्वात पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमामधून लोकप्रिय झाले. या सिनेमामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु (rinku rajguru) हीने आर्ची ही भूमिका साकारली होती. रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
रिंकू कलाविश्वात जितकी सक्रीय आहे. तितकीच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे ती चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
पुन्हा एकदा परश्या पडला आर्चीच्या प्रेमात?; रिंकूच्या फोटोवर आकाशने केलेली 'ती' कमेंट चर्चेत
काही दिवसांपूर्वी रिंकूने गुलाबी रंगाच्या साडीत छानसं फोटोशूट केलं होतं. त्यानंतर याच साडीत तिने एक व्हिडीओदेखील शूट केला आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे तो सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्याच्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.