"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 18:41 IST2023-10-05T18:35:35+5:302023-10-05T18:41:21+5:30
प्रसिद्ध मराठी गरोदर अभिनेत्रीने चाहत्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

"आता बेबी प्रोडक्टचीही जाहिरात करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर गरोदर मराठी अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मी गरोदरपणातही..."
सई लोकूर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे सई प्रसिद्धीझोतात आली. सईने काही मराठी चित्रपटांत काम केलं आहे. सईचा चाहता वर्गही मोठा आहे. सिनेसृष्टीपासून लांब राहणारी सई सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक जीवनातील घडामोडींबद्दल सई सोशल मीडियावरुन माहिती देत असते. काही महिन्यांपूर्वीच सईने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.
गरोदरपणातील काळ सई एन्जॉय करत आहे. सई अनेक व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच सईने इन्स्टाग्रामवरुन तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका बेबी प्रॉडक्टची जाहिरात करताना दिसत आहे. सईच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. "किती व्यावसायिकरण करणार...आता बेबी प्रॉडक्टचीही जाहिरात करणार", असं नेटकऱ्याने म्हटलं होतं. त्याच्या या कमेंटवर सईने सडेतोड उत्तर दिलं आहे.
"तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या गरोदरपणातही काम करत आहे. जाहिराती करत आहे. आयुष्यात लोकांना नाव ठेवणं बंद करून स्वत:साठी काम शोधा," असं उत्तर सईने दिलं आहे. सईच्या या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सईने २०२०मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सई कलाविश्वापासून दूर आहे. तिने 'आम्हीच तुमचे बाजीराव', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', 'पारंबी' या चित्रपटांत काम केलं आहे. 'किस किस को प्यार करू', 'कुछ तुम कहो कुछ हम कहे' या हिंदी सिनेमांतही ती झळकली. आता लग्नानंतर तीन वर्षांनी ती आई होणार आहे.