'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:30 PM2024-02-07T14:30:27+5:302024-02-07T14:32:45+5:30
सईने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. सईने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सई नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून नव-नवे प्रयोग करते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून ती भेटीला येत असते. या अभिनेत्री सई ताम्हणकर परिक्षकाच्या खुर्चीत आहे. मात्र, यावरून तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. यावर आता सईन सडेतोड उत्तर दिलं आहे.
अलिकडेच सईने 'मुंबई तक'ला मुलाखत दिली. सईला हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं असं बोललं जातं. यावर काय सांगशील, असा प्रश्न सईला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'असं म्हणणाऱ्यांना मी फक्त एवढेच सांगेन की एकदा आमच्या खुर्चीमध्ये बसून प्रत्येक स्किटनंतर कमेंट देऊन बघा. आम्हाला स्क्रिप्ट दिलेली नसते. आम्हाला काय बोलायचं, किती बोलायचं आणि काय बोलायचं नाही हेसुद्धा सांगितलेलं नसतं. हे करुन बघा आणि तुम्हाला जमलं तर या आणि आमच्या खुर्चीवर बसा'. वैयक्तीक आयुष्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही तिनं भाष्य केलं.
'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटातून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळतेय. यासोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'भक्षक' सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ती पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. 'भक्षक'हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.