Coronavirus: एकीकडे कोरोनाचं सावट, तर दुसरीकडे ही मराठमोळी अभिनेत्री कोरोनाला म्हणतेय चक्क 'थँक्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:44 PM2020-03-16T15:44:12+5:302020-03-16T15:44:35+5:30

कोरोनाचा धोका लक्षात घेता मालिका, चित्रपट, वेबसीरिज सगळ्यांचे शूटींग काही दिवस रद्द करण्यात आले आहे.

Marathi Actress said Thanks to corona virus because of this reason Tjl | Coronavirus: एकीकडे कोरोनाचं सावट, तर दुसरीकडे ही मराठमोळी अभिनेत्री कोरोनाला म्हणतेय चक्क 'थँक्स'

Coronavirus: एकीकडे कोरोनाचं सावट, तर दुसरीकडे ही मराठमोळी अभिनेत्री कोरोनाला म्हणतेय चक्क 'थँक्स'

googlenewsNext


कोरोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढतो आहे. भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडलीय. दोन जणांचा मृत्यू झाला आहे.सिनेइंडस्ट्रीवर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय. मालिका, चित्रपट, वेबसीरिज सगळ्यांचे शूटींग काही दिवस रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता तर पापाराझींनीही सुट्टीची घोषणा केली आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता कलाकारांनी घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा रिकामा वेळ काहींनी सत्कारणी लावला आहे तर कुणी सुट्टीचा आनंद उपभोगत आहे. त्यात आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तर चक्क कोरोनाचे आभार मानले आहेत.यासोबतच तिने चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहनदेखील केले आहे. 


प्राजक्ता माळी हिने घरात रिलॅक्स अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि म्हटलं की, दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही... थँक्स टू कोरोना. महाराष्ट्र दौरा आता Break ke Baad. गरज होती आरामाची-आपल्या सर्वांनाच.  कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा... प्रोफेशनल्स जे सल्ला देताहेत ते पाळा. भीती नको, काळजी घेऊया. And be assured everything will fall in place very soon❤️


प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर तिचे चाहते काळजी घे अशी कमेंट करत आहेत. 

Web Title: Marathi Actress said Thanks to corona virus because of this reason Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.