'या' कारणामुळे संस्कृती बालगुडे वापरत नाही whatsapp, म्हणाली- "एका व्यक्तीने मेसेज करुन मला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:34 PM2024-07-08T15:34:41+5:302024-07-08T15:35:16+5:30
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीने व्हॉट्स अॅप वापरत नसल्याचा खुलासा केला. "whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारल्यावर संस्कृतीने एक किस्सा शेअर केला.
अभिनयाबरोबर नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. २०१४ साली संस्कृतीने पिंजरा या मालिकेतून छोट्या पडद्यावरी पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना संस्कृती दिसली. संस्कृतीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती पोस्टद्वारे नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. पण, सोशल मीडियावर सक्रिय असणारी संस्कृती मात्र व्हॉट्स अॅप वापरत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संस्कृतीने याचा खुलासा केला आहे.
संस्कृतीने नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिनेइंडस्ट्री, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. या मुलाखतीत संस्कृतीने व्हॉट्स अॅप वापरत नसल्याचाही खुलासा केला. "whatsapp का बंद केलं?" असा प्रश्न विचारल्यावर संस्कृतीने एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली, "तेव्हा whatsapp ला ब्लू टिकचं नवीन फिचर आलं होतं. मी घरी आले आणि कोणीतरी मेसेज केला होता की तू बघितलंस तरीही रिप्लाय नाही केलास. पण, त्या व्यक्तीचा मेसेज आला तेव्हा मी कामात असू शकते. मी मेसेज बघितला असेल आणि तेव्हाच मला शूटसाठी बोलवलं असेल. अशा वेळी आपण फोन देतो आणि मग नंतर कधी रेंज नसल्यामुळेदेखील बघायचं राहून जातं".
"या प्रसंगानंतर मला असं झाली की हे बंधन आपल्याला कशाला हवंय? तू बघितलंस तरी तू रिप्लाय नाही केलास...एक मिनिट...काहीतरी कामात असेन मी. सगळे म्हणतात की ब्लू टिक बंद करून टाकायचं. पण हे मला पटत नाही. मला ही छुपाछुपीदेखील जमत नाही. WhatsApp वर ग्रुप होतात आणि मग लोक ग्रांटेड पकडायला लागतात. मी तुला whatsapp केलेलं ना? असं म्हणतात. पण, तुम्ही फोन करा ना...काही गोष्टी फोनवर सांगितल्या पाहिजेत. whatsapp बंद केल्यानंतर मला खूप लोकांनी फोन केले," असंही संस्कृती पुढे म्हणाली.
संस्कृतीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'सांगतो ऐका', 'शॉर्टकट', 'निवडुंग', 'टेक केअर गुड नाईट', 'भय', 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना ती दिसली. 'काळे धंदे' या वेब सीरिजमध्येही संस्कृतीने काम केलं आहे.