बाबा हा तुझ्यासाठी...! वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू, शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:34 IST2022-02-08T15:32:17+5:302022-02-08T15:34:58+5:30
Sayali Sanjeev gets a tattoo in her father's memory : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे तर कधी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेमुळे. सध्या सायली चर्चेत आहे ती तिच्या टॅटूमुळे.

बाबा हा तुझ्यासाठी...! वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने गोंदवला टॅटू, शेअर केला फोटो
झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे तर कधी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेमुळे. सध्या सायली चर्चेत आहे ती तिच्या टॅटूमुळे. होय, सायलीच्या या टॅटूनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सायलीनं एका खास व्यक्तिच्या आठवणीत हा टॅटू गोंदवला आहे.
होय, या टॅटूचा फोटो शेअर करत, तिने स्वत: ही माहिती दिली. बाबांच्या आठवणीत सायलीने सुंदर टॅटू गोंदवून घेतला आहे. त्याचा फोटो तिने पोस्ट केला आहे. बाबा तुझ्यासाठी, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात सायलीच्या वडिलांचं निधन झालं. बाबांच्या आठवणीत तिने एक भावूक करणारी कविताही पोस्ट केली होती. 31 जानेवारी रोजी सायलीनं तिचा वाढदिवस होता. पण डिसेंबरमध्ये तिच्या वडीलांचं निधन झाल्याने बाबांच्या आठवणीत सायली वाढदिवशी खुपच भावूक झाली होती.
वडिलासोबत बालपणीचा फोटो शेअर तिने एक भावुक पोस्ट शेअर केली होती. ‘मला अतिशय सुंदर आयुष्य दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद...तुम्हीच माझं सर्वस्व आहात,’ असं तिने या फोटोसोबत लिहिलं होतं.
सायलीने पहिल्याच मालिकेतून अवघ्या चाहत्यांची मनं जिंकलीत. ‘काहे दिया परदेस’ ही तिची पहिली मालिका. यानंतर आता ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायलीने साकारलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटातही ती दिसली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयर्सची चर्चा रंगताना दिसते आहे. दोघांच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीवरून चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, याबाबत त्या दोघांनी मौन बाळगलं आहे.