झक्कास! ही मराठी अभिनेत्री एकेकाळी करायची पेट्रोल पंपावर काम, आता मुंबईत सुरू केलं हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:00 AM2022-06-29T08:00:00+5:302022-06-29T08:00:02+5:30
Marathi Actress : घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सिया तिचं नाव आवर्जुन घ्यावं लागले...
घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सिया पाटीलचं (Siya Patil ) नाव आवर्जुन घ्यावं लागले. झक मारली बायको केली, कॅश करुनी अॅश करू, चल गंमत करू, नवरा माझ्या बायकोचा, भागम भाग,अपना सपना बोंबाबोंब, बाप रे बाप,धूम टू धमाल, पक्याभाई यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये स्वत:चा ठसा उमटवणारी सिया पाटीलनं बराच मोठा संघर्ष करून इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. आता हॉटेल इंडस्ट्रीतही ती आपली ओळख निर्माण करू पाहतेय.
होय, मुंबईतील चांदीवली येथील स्टुडिओच्या समोर ‘गाव करी’ नावाचं हॉटेल तिने सुरू केलं आहे. या हॉटेलमध्ये खवय्यांना महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थांची चव चाखता येणार आहे. या हॉटेलचे दोन व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही महिन्यांपूर्वी तिने मुंबईत S. Sense salon and spa नावाने सलून उभारले. आता सियाने मुंबई सारख्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे.
सिया मुळची सांगली जिल्ह्यातील. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हे तिचं गाव. गावात पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठलं. एम कॉमसोबत कम्प्युटर डिप्लोम केला. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगचं जग खुणावू लागलं. काही जाहिरातींमध्ये झळकण्याची संधी तिला मिळाली. पुढे नाटकात तिची एन्ट्री झाली आणि बघता बघता सिनेमात तिला ब्रेक मिळाला.
पेट्रोल पंपावर केलं काम...
सिया हिचे वडील शंकरराव पाटील हे द्राक्ष बागायतदार होते. आटीपाडी येथील साखर कारखान्याचे ते संचालकही होते. 2010 साली त्यांचं निधन झालं. सियाने स्वबळावर आपली ओळख निर्माण केली. घरातून कुठलीही आर्थिक मदत न घेता ती इथपर्यंत पोहोचली. अगदी संध्याकाळी दोन तास पेट्रोलपंपावर आणि फूडवर्डवर अकाऊंटंट म्हणून तिने काम केलं. दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस तिने घेतले.