शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:57 IST2023-10-06T13:56:31+5:302023-10-06T13:57:08+5:30
आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाळेच्या गणवेशातील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेसृष्टीची आहे 'अप्सरा'
आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फिलमवाला या इन्स्टाग्राम पेजवरुन मराठी अभिनेत्रीचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये एक चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत आहे. तिचा निरागस गोंडस चेहरा पाहून ही अभिनेत्री कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे.
सोनाली कुलकर्णीने अगदी कमी वेळात मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करते. अनेक चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाचा ठसा उमटवणारी सोनाली मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाते. 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'धुरळा', 'पोश्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा' अशा चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. 'हिरकणी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.