"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:59 PM2024-10-02T17:59:51+5:302024-10-02T18:00:34+5:30

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सोनालीच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे.

marathi actress sonalee kulkarni reply to fan who commented on her suryanamskar yoga video | "दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनयाबरोबरच सोनाली तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. सोनाली तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. सोनाली नियमित योगा करते. याचे व्हिडिओही ती अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करत असते. यातून ती चाहत्यांनाही फिटनेसचे धडे देताना दिसते. पण, सोनालीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओवर चाहत्याने खोचक कमेंट केली आहे. 

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यनमस्कार करताना सोनालीचा कमालीचा फिटनेस दिसत आहे. सोनालीच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. 


"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" अशी कमेंट चाहत्याने केली आहे. चाहत्याच्या या कमेंटवर सोनालीने अगदी चोख उत्तर दिलं आहे. सोनालीने या चाहत्याला रिप्लाय करत "मी " असं म्हटलं आहे. 

बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून सोनालीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली. हिरकणी, झिम्मा, पोश्टर गर्ल, मितवा, नटरंग, क्लासमेट्स, पांडू, क्षणभर विश्रांती, रमा माधव अशा सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. 

Web Title: marathi actress sonalee kulkarni reply to fan who commented on her suryanamskar yoga video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.