Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने आईला दिली नितांत सुंदर भेट, पाहून तुम्हीही कराल तिचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:57 AM2022-09-16T11:57:54+5:302022-09-16T11:59:07+5:30

Tejaswini Pandit: होय, तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट वाचून सोशल मीडियावर तेजस्विनीचं प्रचंड कौतुक होत आहे...

Marathi actress Tejaswini Pandit gave a very beautiful gift to HER mother | Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने आईला दिली नितांत सुंदर भेट, पाहून तुम्हीही कराल तिचं कौतुक

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितने आईला दिली नितांत सुंदर भेट, पाहून तुम्हीही कराल तिचं कौतुक

googlenewsNext

मराठीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयानं तिने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनी अभिनयाच्या दुनियेत आली आणि इथेच रमली.

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तेजस्विनीला घडवण्यात आईचा मोठा वाटा आहे. आईच्या पुण्याईतून उतराई होणं शक्य नाही पण तिच्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. तेजस्विनीने सुद्धा आईला वाढदिवसाचं निमित्त साधत तिला एक खास भेट दिली.
होय, तेजस्विनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट वाचून सगळे तेजस्विनीचं कौतुक करत आहेत. आईला वाढदिवसानिमित्त तिने आईला एक अत्यंत सुंदर भेट दिली आहे.

 तेजस्विनी पंडित पोस्ट-

माझी आई स्वामी समर्थांची वर्षानुवर्षे भक्ती करते.नितांत प्रेम तिचं त्यांच्यावर. (मी पण स्वामींना प्रेमाने आजोबा म्हणते ) योगायोगाने आई चा वाढदिवसही जवळ आला होता. वाटलं बाकी वेगळं काहीतरी देण्यापेक्षा तिला स्वामींची सुबक मूर्ती द्यावी. माझा शोध सुरू झाला. आणि मग अनेक अनुभव येऊ लागले.
एका गुरुवारी अचानक भावाने स्वामींची अक्कलकोट हून आणलेली फोटो फ्रेम दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ओळखीतल्या गुरुजींनी संक्षिप्त गुरूचरित्र दिले, असे अनेक अनुभव येऊ लागले 'डोळ्यात भरेल' अशी मूर्ती शोधत होते (बस हीच असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ) अनेकांनी शोधायला मदत ही केली... मग शेवटी ते म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही. Instagram scroll करताना स्वामी भक्त केदार शिंदे दादाच्या एका फोटो मधली मूर्ती पाहिली आणि लगेच त्याला फोन केला....ही मूर्ती कुठून घेतलीस...त्वरित फोन वर एक नंबर त्याने पाठवला स्वामी आर्ट्सच्या विश्वंभर साळसकर ह्यांचा...त्यांच्याकडे एक से एक मूर्त्या पाहायला मिळाल्या...
कलाकार हा फक्त मूर्ती बनवत नाही तर त्याच्यात जीव भरतो, ह्यावर ठाम विश्वास बसला... स्वामींचं हे रूप पाहिल्यावर एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी या अशी विनंती केली. आणि मनात अनन्य श्रद्धा असणार्‍या कोणालाच स्वामी नाराज करत नाहीत. अखेर आईच्या वाढदिवसाला आजोबांनी विनंती ऐकली आणि घरी आले.
प्रचंडं ऊर्जा देतात ते आम्हाला. रोज आमच्याकडे बघतात आणि म्हणतात, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
ता क : आजही गुरुवारंच 

Web Title: Marathi actress Tejaswini Pandit gave a very beautiful gift to HER mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.